ग्रामपंचायतींकडून एकाच दिवसात १ कोटी ३ लाखाची कर वसुली

ग्रामपंचायतींकडून एकाच दिवसात १ कोटी ३ लाखाची कर वसुली
Gram Panchayat Tax
Gram Panchayat TaxSaam tv
Published On

लातूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरणा ३१ मार्चपर्यंत न केल्यास त्या गावांतील थकबाकीदार ग्रामस्थांच्या नावाची यादी चावडीवर, मोक्याच्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. तसेच न्यायालयात दावा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल; अशी तंबी जिल्हा परिषदेने (Zilha Parishad) दिल्याने १६ ते ३१ मार्च या पंधरवड्यात २९ मार्च रोजी १ कोटी ३ लाख १७८ रूपये वसूल झाले. (latur news one crore 3 lakh tax collected from Gram Panchayat in a single day)

Gram Panchayat Tax
भाव खाणारा कांदा पुन्हा रस्त्यावर

लातूर (Latur) जिल्ह्यात ७८५ ग्रामपंचायती असून आतापर्यंत म्हणजे वसुली पंधरवडा सोडून केवळ ५८ ग्रामपंचायतींनी घरपट्टी, पाणीपट्टी भरली. उर्वरित ७२७ ग्रामपंचायतींनी घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरलेला नव्हता. हा त्यांच्या अंतर्गत न भरणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) अधिकारी अभिनव गोयल यांनी वसुली पंधरवडा आयोजित केला. ७० टक्क्यांपेक्षा कमी वसुली असलेल्या ग्रामपंचायतींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पंधरवड्यात तब्बल १ कोटी ३ लाख १७८ रूपये वसूल झाले. ही उल्लेखनीय वसुली असून, या कर वसुलीमुळे ग्रामपंचायती सक्षम होण्यास हातभार लागणार आहे.

आता त्‍या ग्रामपंचायतींवर कायदेशीर कारवाई

कर वसुली पंधरवड्यात उर्वरित १४ दिवसांचा लेखाजोखा येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असून ज्या ग्रामपंचायतींनी कर भरण्यास फारसा रस दाखवला नाही; अशा ग्रामपंचायतींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईचे स्वरूप ग्रामपंचायत बरखास्त करण्याचेही असू शकते. त्यामुळे कर भरणा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com