banana crop insurance
banana crop insurance Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : केळी पीक विम्याची रक्कम मिळेना; राजकीय नेत्यांना गावबंदी

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. केळीच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना (farmer) अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. यामुळे केळी पीक विमा रक्कम मिळेपर्यंत राजकीय नेत्याना गावा बंदी करण्याचा निर्णय रावेर (Raver) तालुक्यातील तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी घेतला. गावकऱ्यांच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

जळगाव जिल्ह्यात ८१ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित केळी पीक विमा काढला होता. यापैकी दहा ते पंधरा हजार शेतकऱ्याना केळी पीक विमा (Banana Crop Insurance) माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली नाही. या संदर्भात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शासन दरबारी तसेच राजकीय नेत्यांना भेटून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसून शेतकऱ्यांना पीक विमा रकमेची प्रतीक्षा आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैठक घेऊन एक मताने निर्णय 

राजकीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही कोणताही मार्ग निघत नसल्याचे लक्षात आल्यावर आता या शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय एक बैठकीमध्ये घेतला. तांदलवाडी येथील केळी (Banana Crop) उत्पादक शेतकऱ्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार आणि विमा कंपनी बाबत संताप व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून केली अटक

Malegaon News: क्षुल्लक भांडणावरून ८ वर्षांच्या चिमुकलीची हत्या, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

OTT Released This Week : ‘द नक्सल स्टोरी’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, OTT वर मनोरंजनचा धमाका; पाहा लिस्ट

Uddhav Thacekray Dombivli Speech: फडणीवस ते मोदी ठाकरेंनी सगळ्यांनाच धारेवर धरलं

Bhiwandi Politics News | "ते भाजपचीच बी टीम.." भिवंडीच्या राजकारणात एकच खळबळ

SCROLL FOR NEXT