Cotton Soyabean Price : कापूस, मिरची, सोयाबीनला अजूनही भाव नाही; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाला आहे. शिवाय अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला होता.
Cotton Soyabean Price
Cotton Soyabean PriceSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : यंदा शेतीमालाला सुरवातीपासूनच चांगला भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. शेतीमालाच्या (Nandurbar) भावात अजूनही सुधारणा होत नसून कापूस, सोयाबीन व मिरचीला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)

Cotton Soyabean Price
Health Department In Raid : घरात सुरु होते अनधिकृत गर्भलिंग निदान; धाड टाकत आरोग्य विभागाची कारवाई, महिला ताब्यात

नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाला आहे. शिवाय अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला होता. यात दोन हात करत शेतकऱ्यांनी पीक जगवले होते. परंतु (Cotton Price) कापूस, मिरची आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येऊन ठेपलं आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार नाही; अशी परिस्थिती आता शेतकऱ्यांसमोर उद्भवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cotton Soyabean Price
Sugar Factory : साखर कारखान्याचे केमिकलयुक्त पाणी शेतात; पिकांची होतेय खराबी

सध्या नंदुरबार बाजार समितीत सोयाबीन ४ हजार २०० ते ४ हजार ७२६ रुपये, कापूस ५ हजार ६०० ते ७ हजार १०० रुपये दरा तर मिरचीला २ हजार ५०० पासून ते ४ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने कापूस, मिरची आणि सोयाबीन काय झालं पिकांना योग्य भाव ठरवून द्यावे; अशी मागणी शेतकरी राजाकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com