Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News : सरकारच्या उदासीन धोरणा विरोधात पारोळ्यात राष्ट्रवादी रस्त्यावर; कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी दिले निवेदन

Jalgaon News : सरकारच्या उदासीन धोरणा विरोधात पारोळ्यात राष्ट्रवादी रस्त्यावर; कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी दिले निवेदन

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : पारोळा तालुक्यातील पाचही मंडळात गेल्या महिन्याभरापासून पाऊस पडला नाही. पाण्याअभावी (Jalgaon) पिके करपू लागली आहेत. तर चारा व पाण्याअभावी पशुधन जगवायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. परंतु राज्य सरकारकडून अद्याप काही घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारच्या या उदासीन धोरणाविरुद्ध (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. (Live Marathi News)

कर्ज काढून काळ्या आईच्या कुशीत सोने पिकेल या आशेने शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस केला. मात्र ग्रामीण भागातील वाढती लोडशेडिंग व राज्य सरकारचे उदासीन धोरण यामुळे आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पारोळा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची असून १५ सप्टेंबरपर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास मतदार संघात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल असा इशारा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला. (Farmer) शेतकऱ्यांच्या विविध मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय ते कासोदा रस्त्या लागत असलेल्या प्रशासकीय तहसील कार्यालय इमारत पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर येत शासनाला जाग येण्यासाठी घोषणा दिल्या. यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी जि. प. सदस्य रोहन पाटील, बाजार समिती संचालक रोहन मोरे, हिम्मत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. शांताराम पाटील, व्यापार व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोराज पाटील, तालुकाध्यक्ष संतोष महाजन, युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे आदी पदाधिकारीसह शेतकरी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे पिक जळत असतांना शासनाच्यावतीने कोणतीही मदत जाहीर होत नाही. उलट संपुर्ण तालुक्यात पाचही महसुल मंडळामध्ये शेतकरी पिक विम्यास पात्र असतांनाही शासनाकडून मदत मिळाली नाही. अशा विदारक परिस्थीतीत शेतक-यांच्या बांधावर जाऊन पिक परीस्थीतीचा आढावा घेतला पाहिजे. शासनाने त्वरीत सर्वच महसूल मंडळांना पिक पिम्या साठी पात्र ठरवून २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कंपन्याना द्या. संपुर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करुन सरसकट पंचनामे करुन शेतक-यांना राज्य आपत्ती निवारण निधीमधुन अर्थिक मदत करावी.; अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT