चेतन व्यास
वर्धा : वर्षभरापूर्वी जनावरांमध्ये लम्पि आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला. यात अनेक जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. आता पुन्हा (Lumpy Disease) लम्पि आजाराने डोके वर काढले असून (Wardha) वर्धा जिल्ह्यात लम्पि आजाराने गेल्या पाच महिन्यात २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
कोट्यावधीचा खर्च तरीही नियंत्रणात नाही
लम्पि आजाराच्या निर्मूलनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हा निधी मार्च २०२३ पर्यत खर्च झाला असल्याची माहिती आहे. नेमका खर्च इतक्या लवकर करण्यात आला असताना देखील लम्पिचे निर्मूलन होऊ शकले नाही. लसीकरणासाठी २ लाख ७५ हजार ९०० लसी प्राप्त झाल्या होत्या. यातील २ लाख ७२ हजार ३०० लसीकरण पुर्ण झालेय. वाढत्या लम्पि आजाराला आटोक्यात आणण्यासाठी कोट्यवधी खर्च झाले असताना देखील वर्ध्यात लम्पिचे निर्मूलन होऊ शकले नाही. त्यामुळे कोटीच्या वरचा खर्च नेमका झाला कुठे असाच प्रश्न उपस्थित होत आहेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.