जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राजवड गावातील महिला शेतकरी मनीषा पाटील यांनी तीन एकरात पाचच महिन्यात पंचवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून राज्यातील शेतकऱ्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला (Jalgaon News) आहे. आपल्याला उत्पन्न मिळत असताना परिसरातील दहा ते पंधरा महिलांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे आनंद होत असल्याचं मनीषा पाटील सांगतात. (latest marathi news)
शेती परवडत नसल्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांनी आत्महत्या करतात. मात्र, पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत खरबूज आणि मिरची पिकाला रासायनिक खतांचा कमीत कमी वापर त्यांनी (Manisha Patil) केला. तसंच दूध, अंडी, गोमूत्र यांचा वापर करत जळगाव जिल्ह्यातील राजवड गावातील महिला शेतकरी मनीषा पाटील यांनी तीन एकरात पाचच महिन्यात पंचवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेतीतून मिळवलं भरघोस उत्पन्न
मनीषा पाटील यांच्याकडे दहा एकर शेती आहे. त्यात मनिषा गहू, ज्वारी, कापूस यासारखी पारंपरिक पिके घेत होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने त्यांना शेती करणे परवडत नव्हतं. अशातच त्यांची एका शेती विषयक कार्यक्रमात सागरसिडचे प्रतिनिधी भगवान पाटील यांच्यासोबत ओळख झाली. कृषी तज्ज्ञ असलेल्या भगवान पाटील यांनी त्यांना खरबूज आणि मिरची पिकाचे आंतरपीक घेण्याचा सल्ला दिला (Woman Farmer Success Story) होता. भगवान पाटील यांचा हा सल्ला मनीषा पाटील यांना चांगलाच फायदेशीर ठरला आहे.
ज्या पारंपरिक पिकातून त्यांना उत्पादन खर्च काढणे कठीण जात होते, त्याच ठिकाणी त्यांना पंचवीस लाख रुपयांचे उत्पन्न केवळ पाचच महिन्यात मिळालं आहे. आपल्याला उत्पन्न मिळत असताना परिसरातील दहा ते पंधरा महिलांना रोजगार उपलब्ध झाला, असंही त्यांनी सांगितलं आहे. खरबूज आणि मिरची पिकांचं अंतर पीक घेण्यापूर्वी मनीषा पाटील यांनी आपल्या शेताची खोल नांगरट आणि वखरणी करून शेताची मशागत केली होती.
शेणखताचा जास्त वापर
पाच बाय पाचवर बेड तयार करून त्यावर ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करून त्यांनी मिरची (Chili) आणि खरबूज रोपांची लागवड केली होती. यावेळी रासायनिक खताचे प्रमाण कमी आणि शेणखत जास्त वापरून त्यांनी आपल्या शेतीमधील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचं काम केलं (Farmer Success Story) होतं. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला आहे.
खरबूजमधून त्यांना पंचवीस टन उत्पन्न मिळालं आहे. त्यातून त्यांना पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. तर मिरची पिकातून त्यांना दोनशे क्विंटल उत्पन्न चार तोडणीत निघालं (Success Story) आहे. अजून एवढंच उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.