सागर निकवाडे
नंदुरबार जिल्ह्यातील काकदे शिवारात एका शेतकऱ्याने चक्क काळ्या गव्हाचं उत्पादन घेतलं आहे. पंजाबमधील मोहली येथील राष्ट्रीय कृषी अन्य आणि जैवतंत्रज्ञान संस्थेने काळ्या गव्हाचं वाण हे विकसित केलं आहे. हे वाण दोन वर्षांपासून उत्तर भारतात पेरणी करून शेतकरी मोठा नफा कमवत आहेत.
उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नंदुरबार तालुक्यातील काकदे गावातील शेतकऱ्यांनीही काळा गहू लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय. बाबूलाल माळी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
बाबूलाल माळी हे पुण्यात नोकरी करत असताना अगोदरपासूनच त्यांना शेतीची आवड आहे. त्यामुळे त्यांनी 8 एकर शेती विकत घेतली. पुढे सेवानिवृत्त झाल्यानंतर ते गावाकडे शेती करायला लागले. बाबूलाल माळी हे नेहमी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. त्यातच त्यांनी आता काळ्या गव्हाचा यशस्वी प्रयोग केलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील नागठाणे इथून एका शेतकऱ्यांकडून त्यांनी 20 किलो काळ्या गाव्हाची बियाणे खरेदी केली आणि ती आपल्या शेतात पेरली. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी आपल्या अर्ध्या एकर क्षेत्रावर काळ्या गव्हाची लागवड केली होती. अर्ध्या एकरात केलेला हा गहू सध्या चार फुटांचा झाला असून कमी खर्चात त्याचं जास्त उत्पन्न आता येणार आहे.
साधारण गव्हाला 4 हजार ते 5 हजार प्रतिक्विंटल दर मिळत असतानाच काळा गहू हा अधिकच्या भावाने विकला जातो. मधुमेह आणि इतर अनेक रोगांसाठी आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या या गव्हाला अधिकची मागणी असून बाजारात त्याची 8 हजार ते 10 हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. या अनोख्या शेतीचा शेतकऱ्याला चांगला फायदा होत आहेत.
काळ्या गव्हाचे वैशिष्ट्य
• सामान्य गव्हाचा तुलनेत काळ्या गव्हाला भाव जास्त
• काळ्या गव्हामध्ये सामान्य गावापेक्षा 60% जास्त लोह असते
• गव्हाचा काळा रंग त्यामध्ये असलेल्या अथोसायनीन नावाचा रंगद्रव्यामुळे येतो.
• या जातीमध्ये अँटीएक्सीडट घटक आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.