Farmer Success Story
Farmer Success StorySaam tv

Farmer Success Story : दुष्काळात फुलवली पेरूची बाग; पाण्याचे योग्य नियोजनातून लाखोंचे उत्पन्न

Hingoli News : बागेची लागवड केल्यानंतर बागेची योग्य निगा, पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्याने शेतकरी जगताप यांना पेरू बागेतून लाखो रुपयांची कमाई सुरू झाली आहे.
Published on

संदीप नागरे 
हिंगोली
: मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतात नापिकी होऊन शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल आहे. कधी ओला (Hingoli) तर कधी कोरडा दुष्काळ बळीराजाच्या पाचवीला पुंजल्याने हतबल झालेला शेतकरी आपलं जीवन दिवसेंदिवस संपत आहे. मात्र मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील ईसापुर गावच्या एका (Farmer) शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत दुष्काळी स्थितीत देखील पाण्याचे योग्य नियोजन करत तैवान जातीच्या पेरूची बाग फुलवली आहे. (Latest Marathi News)

Farmer Success Story
Sangola News : इमारतीला आग लागून भीषण स्फोट; एकाच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

हिंगोलीच्या ईसापूर गावात वडिलोपार्जित एक हेक्टर शेती असलेल्या शेतकरी संतोष जगताप यांच्या पेरू बागेची पाहणी करण्यासाठी आज हिंगोलीचे कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे, तालुका कृषी अधिकारी कमलाकर सांगळे, कृषी सहाय्यक ग्यानबा वंजारे, पेरू बागायतदार शेतकरी संतोष राजाराम जगताप यांच्या शेतात पोहचले होते. बागेची लागवड केल्यानंतर बागेची योग्य निगा, पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्याने शेतकरी जगताप यांना पेरू बागेतून लाखो रुपयांची कमाई सुरू झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Farmer Success Story
Bribe Case : चाळीस हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या ताब्यात 

पुढचे २० वर्ष बागेतून उत्पन्न 

विशेष म्हणजे जगताप यांनी लागवड केलेली पेरूची झाडे गुणवत्ताधारक असल्याने पुढचे वीस वर्ष ही बाग उत्पन्न देणार असल्याचे सांगत आपल्या कुटुंबाचा आर्थिक गाडा सुरळीत राहणार असल्याचा विश्वास या वेळी जगताप यांनी बोलून दाखवला. हिंगोली जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देत शासकीय योजनेतून फळबागा लागवड करण्याचे आवाहन; यावेळी कृषी अधीक्षकांनी केले. यासाठी कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागातील तज्ञांचा मार्गदर्शन देखील घ्यावे; असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com