Manasvi Choudhary
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे.
गेली सहा दशकाहून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले आहे.
अभिनेते धर्मेंद्र हे केवळ प्रोफेशनल नाही तर पर्सनल लाईफमुळे देखील कायमच चर्चेत राहिले.
अभिनेते धर्मेंद्र यांनी दोन वेळा विवाह केला त्यांचे कुटुंब मोठं आहे. धर्मेंद्र यांच्या कुटुंबात कोण आणि किती व्यक्ती आहेत हे जाणून घेऊया.
धर्मेंद्र यांना दोन पत्नी, चार मुली, दोन मुले, दोन सुना, जावई आणि १३ नातवंडे आहेत.
धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये प्रकाश कौरशी लग्न केले. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना सनी देव, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देऑल ही चार मुले आहेत.
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी दुसरे लग्न केले आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा आणि अहाना देओल दोन मुली आहेत.