Crime Torture Saam tv
महाराष्ट्र

‘इंन्स्टाग्राम’च्या मैत्रीतून प्रेम..हॉटेलवर नेत अत्‍याचार करून व्हिडीओ रेकॉडींग

‘इंन्स्टाग्राम’च्या मैत्रीतून प्रेम..हॉटेलवर नेत अत्‍याचार करून व्हिडीओ रेकॉडींग

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : इन्टाग्रामवर मैत्री करून ३३ वर्षीय विवाहितेवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. एवढेच नाही तर हॉटेलमध्ये केलेले व्हिडीओ दाखवून ५० हजाराची मागणी केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस (Police) ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news Love from Instagram friendship and Video recording by taking her to hotel)

जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबीयांसह वास्तव्यास असलेल्या ३३ वर्षीय विवाहिता ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून संसाराला हातभार लावते. त्यांचे इन्ट्राग्राम या सोशल मिडीया (Social Media) साईटवरवर त्यांचे खाते आहे. या खात्यावरून संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी (वय ४८) याची ओळख झाली. इन्ट्राग्रामवर (Instagram) मैत्री झाल्याने फेशीयल करण्याचे कारण दाखवून विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश चौधरी हा घेवून गेला.

अत्‍याचाराचा व्‍हीडीओ करून ब्‍लॅकमेलिंग

विवाहितेच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा फिरवून आणण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये घेवून गेल्यावर पुन्हा अत्याचार केला. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ बनविला. व्हिडीओ बनवून विवाहितेला ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला दाखवले अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरु केले. प्रकरण चिघळत चालले असल्याने तीने पतीला विश्वासात घेत सर्व सांगीतल्याने पतीनेही तिची साथ दिली. विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT