Sanjay Sawant Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha : जळगावमध्ये आरोपांची राळ उडाली; लोकसभेचं रणांगण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं केला मोठा दावा

Jalgaon News : भाजप जर ५ लाख पेक्षा अधिक मताधिक्याची घोषणा करत असेल तर त्यांना असे कटकारस्थान करायची काय गरज आहे.

संजय महाजन

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात पराभव दिसत असल्यामुळे भाजपने डमी उमेदवार उभा केला. (Jalgaon) इतकेच नाही तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील मॅनेज केला. शिवसेनेचे मताधिक्य कमी करण्यासाठी हा (BJP) भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केला आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार यांना हरविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) उमेदवार आणि डमी उमेदवार करणसिंग संजयसिंग पवार हे भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात माझ्याकडे कागदोपत्री पुरावे देखील असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत संजय सावंत यांनी माहिती दिली आहे. 

मग कटकारस्थान करायची गरज काय 

भाजप जर ५ लाख पेक्षा अधिक मताधिक्याची घोषणा करत असेल तर त्यांना असे कटकारस्थान करायची काय गरज आहे. करण पवार नावाचा दुसरा उमेदवार त्यांना शोधायची गरज पडली. मात्र करण पवार शोधताना त्यांना करणसिंग संजयसिंग पवार नावाचा डमी उमेदवार मिळाला आहे. मात्र राजकीय दबाव वापरून त्याचे नाव करण संजय पवार घोषित करावा लागलं. वंचितला जळगावमध्ये उमेदवार सापडत नव्हता. पण हे दोन्ही उमेदवार २५ तारखेला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान अर्ज दाखल करायला आले. दोघांची नोटरी सुद्धा ३८२ आणि ३८३ एमआरडी शर्मा नावाच्या एजंटकडून आहेत. ते भाजपच्या कर्मचाऱ्यांच्या चाळीसगाव कार्यालयातील आहे. हे दोन्ही उमेदवार हे (Chalisgaon) चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे सहकारी असल्याचा आरोप करत ही भाजपची बी टीम असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत डेडलाइन वाढली; आजच करा हे काम

Stylish Blouse Designs : साडी, लेहेंगा अन् स्कर्ट; एकाच ब्लाउजचे अनेक लूक्स, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

SCROLL FOR NEXT