Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil News : तर जयंत पाटील महायुतीत नक्कीच मंत्री राहिले असते; मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य

Jalgaon News : मनसे, शिवसेना आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. त्यामुळे बैठकीत चर्चा झाली असेल तर ते लवकरच बाहेर येईल

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : भाजप- शिवसेना सत्तेत असताना राष्टवादी अजित पवार गटाने पाठींबा दिल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. असेच (Jayant Patil) जयंत पाटील हे जर महायुतीत आले असते, तर ते नक्कीच मंत्री राहिले असते. आता त्यांच्या हे लक्षात आले असेल की आपण चूक केली आहे; असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. (Tajya Batmya)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलत होते. त्यांनी यावेळी मनसे (BJP) भाजप युतीसंदर्भात बोलताना सांगितले, कि मनसे, शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. त्यामुळे बैठकीत चर्चा झाली असेल तर ते लवकरच बाहेर येईल. 


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रावेर मतदार संघात एकनाथ खडसे (Eknath Khadse) किंवा रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा आहे. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली, तर बारामतीप्रमाणे रावेरमध्येही नणंद भावजय असा सामना पाहायला मिळू शकणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे. तसेच भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुती म्हणून ते जे उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT