Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : दार उघडताच दिसला बहिणीचा मृतदेह; मुलीने संपविली जीवनयात्रा

Jalgaon News : शाळेत काम करण्यासह दिवसा मोलमजुरी करणाऱ्या शालिक पवार यांच्याकडे दुपारी शिक्षकांनी शाळा बंद झाल्यानंतर चावी दिली

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुणच्या शाळेत वाचमन दाम्पत्य कामानिमीत्त बाजारात गेले होते. या दरम्यान (Jalgaon) घरात एकट्या असलेल्या सतरा वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १७ फेब्रुवारीला संध्याकाळच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील शाळेच्या परिसरात वॉचमन असलेले कुटुंब वास्तव्यास आहे. शाळेत काम करण्यासह दिवसा मोलमजुरी करणाऱ्या शालिक पवार यांच्याकडे दुपारी शिक्षकांनी (School) शाळा बंद झाल्यानंतर चावी दिली. त्यानंतर पवार व त्यांची पत्नी कामासाठी बाहेर निघून गेले. त्यावेळी घरी एकटीच असलेल्या विशाखा पवार (वय १७) या मुलीने खोलीचा दरवाजा लोटून घेत रूममध्ये गळफास घेतला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दार लोटताच दिसला मृतदेह 
बहीण विशाखा कुठे म्हणून भाऊ शोध घेत होता. यानंतर घराचे दार लोटले असता  त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत बहिण विशाखा दिसून आली. हे दृश्य पाहून घाबरलेल्या अवस्थेत तो बाहेर आला. शेजाऱ्यांच्या मदतीने विशाखाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT