Cyber Crime : ऑनलाईन लुटमार करणाऱ्या भाऊ- बहिणीला अटक; ४८ चेकबुक, एटिएम कार्ड जप्त

Jalgaon News : तक्रारदाराचा भरवसा जिंकत ५ लाख ६४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्या प्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल होता
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : शहरातील एका तरुणाला २७ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत सोशल मीडिया व व्हॉटसऍप क्रमांकावरुन संपर्क व मेसेज चॅटींग करुन रसायन खरेदी विक्रीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविले. (Jalgaon) झटपट पैसा दुप्पट करण्याच्या योजनेतून तक्रारदाराचा भरवसा जिंकत ५ लाख ६४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्या प्रकरणी (Cyber Crime) सायबर ठाण्यात गुन्हा दाखल होता. या दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांनी भिलवाडा (राजस्थान) येथून संशयित भाऊ-बहिणीच्या जोडीला अटक केले आहे. (Tajya Batmya)

Cyber Crime
Mumbai- Nashik Highway : धावत्या गॅस टॅकरने घेतला पेट; मुंबई- नाशिक महामार्गावरील घटना

जळगाव सायबर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून तपास सुरु केला. संबधीत बँक व मोबाईल कंपनी यांचेकडे (Police) पत्रव्यवहार करुन माहीती प्राप्त केली. माहितीच्या आधारे संशयित सायबर गुन्हेगार चंदाकुमारी उर्फ तानिया सत्यनारायण शर्मा (वय ३०) व भरत सत्यनारायण शर्मा (वय२७, रा. भिलवाडा, राजस्थान) या दोघांना राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber Crime
Gondia News : प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स काढून विक्री; कॉपीराईट अंतर्गत दुकानांवर कारवाई

राजस्थानमधून केली दोघांना अटक 

जळगाव पोलिसांच्या (Cyber Police) पथकाने राजस्थानातील भिलवाडा येथे शास्त्रीनगर येथून अटक केली. अटकेतील दॊघेही भाऊ- बहिण असून त्याच्या ताब्यातून ४८ वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे २ मोबाईल फोन, ५ सिमकार्ड असे पुरावे आणि दस्तऐवज पोलिस पथकाने जप्त केले आहे. संशयितांना जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची ५ दिवसांच्या कोठडीत रवानगी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com