भाजप-शिंदेसेनेत सत्ता संघर्ष, जिल्हा बँकेतील सत्तेवरून महायुतीत कलगीतुरा

BJP vs Shinde Sena: जिल्हा बँकेतील सत्तेवरून महायुतीतच कलगीतुरा रंगलाय. साताऱ्यानंतर भंडाऱ्यात मित्र पक्षांनी भाजपला धक्का दिलाय. तर जळगावमध्येही भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने आलीय़...महायुतीतच रंगलेल्या या कुरघोडीच्या राजकारणावरचा हा खास रिपोर्ट.....
Mahayuti Alliance Faces Internal Turmoil
Mahayuti Alliance Faces Internal Turmoilsaam tv
Published On: 

सातारा जिल्हा बँकेवरील वर्चस्वाच्या लढाईत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीनं भाजपला दूर ठेवत सत्ता मिळवली. सातारा बँकेवरील वर्चस्वासाठी झालेल्या कुरघोडीच्या राजकारणावरून महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलीये. सातारा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप नाराज असल्याचं दिसतंय. एव्हंढच नव्हे तर सातारा बँकेवरील कुरघोडीच्या राजकारणावरून जिल्ह्यातील भाजपचे मंत्री आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. पक्षांतर्गत कुरघोड्यांचा फटका बसल्याचं सांगत मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी पराभवाचं खापर अप्रत्यक्षपणे मंत्री जयकुमार गोरेंवर फोडलंय...

खरंतर, महायुतीतला सत्ता संघर्ष काही सातारा जिल्हा बँकेपुरताच मर्यादित नाही. भंडाऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीतील मित्रपक्षांनीच भाजपविरोधात मोठा डाव टाकलाय. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसशी हातमिळवणी करत सभापतीपदावर कब्जा केलाय. भाजपनं अडीच वर्ष सभापतीपदाचं आश्वासन पाळला नसल्याचा आरोप शिंदेसेनेनं केलाय.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. जिल्हा बँक निवडणुकीनिमित्तानं भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित पाटील यांच्यात संघर्ष सुरू झालाय. त्यामुळे अंतर्गत मतभेद, नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप आणि उमेदवारीवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील वादाची शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी अप्रत्यक्षपणे कबुलीच दिलीये... तर दुसरीकडे, भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा केलाय.

मुळात महायुतीत स्थानिक पातळीवरही समन्वय राहावा म्हणून समन्वय समिती स्थापन करण्यात आलीय. मात्र स्थानिक पातळी सोडा झे़डपी आणि जिल्हा बँकांमध्येही महायुतीत फाटाफूट झाल्याचं समोर आलाय. केवळ आमदारच नव्हे तर मंत्र्यांमध्येही बेबनावर असल्याचं उघ़ड झालंय. हे कमी होतं की काय भाजपनं पालघरमध्ये शिंदेसेनेलाच खिंडार पाडलं. त्यामुळे पुढच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होणार की दोन्ही पक्षांचे नेतृत्व यावर तोडगा काढणार याची उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.