Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : वडील घराला कडी लावून निघाले अन्‌ घात झाला; तिसऱ्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांना अमळनेर येथे प्रचारला जायचे असल्याने आपण लगेच परत येऊ म्हणून जेवणानंतर प्रेरणाला घरातच राहण्याचे सांगत त्यांनी फ्लॅटच्या मुख्य दाराला कडी लावून निघून गेले

Rajesh Sonwane

जळगाव :राजकारणात सक्रिय असलेले वडील प्रचारासाठी जाणार होते. यामुळे गतिमंद असलेल्या मुलीला घरात राहू देत दाराला कडी लावून मार्गस्थ झाले. मात्र काही वेळाने मुलीने गॅलरीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील मुंदडा नगरात घडली. 

प्रेरणा रमेश गजरे (वय १९) असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. (Jalgaon News) दरम्यान प्रेरणा हि गतिमंद असल्याने वडील रमेश गजरे तिची काळजी घेत होते. तिला कधीच एकटी सोडत नसत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांना अमळनेर (Amalner) येथे प्रचारला जायचे असल्याने आपण लगेच परत येऊ म्हणून जेवणानंतर प्रेरणाला घरातच राहण्याचे सांगत त्यांनी फ्लॅटच्या मुख्य दाराला कडी लावून निघून गेले. 

साडी बांधून उतरण्याचा प्रयत्न 
वडिलांनी दार बाहेरुन बंद केल्याने घरात एकटी असल्याने प्रेरणा हिला कंटाळा आला. यामुळे बाहेर जाऊ या उद्देशाने तिने कपाटातून काही साड्या काढल्या. गॅलरीला बांधून खाली खेळायला जाण्याच्या इराद्याने तिने उतरण्याचा प्रयत्न केला. तसे करताना तिच्या हातातून साडी सुटली आणि ती थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. यात तिचा मृत्यू झाला. जोरात आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली तर रक्ताच्या थारोळ्यात प्रेरणा पडलेली दिसली. याबाबत तिच्या वडिलांना माहिती देण्यात आल्यानंतर ते लागलीच आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

SCROLL FOR NEXT