Mokhada News : मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या; नागरिकांचा मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा

Palghar News : रात्री उशिरा झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून साडेअकराच्या सुमारास मुलीच्या घराच्यांनी शोध घेतला असता मुलगी घरापासून दूर काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
Mokhada News
Mokhada NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 

मोखाडा (पालघर) : सात वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिला जीवे मारल्याची घटना मोखाडा तालुक्यात घडली होती. या घटनेतील अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या; या मागणीसाठी नातेवाईक व ग्रामस्थांनी मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संताप व्यक्त केला आहे.

पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रविवारीच्या मध्यरात्री अत्याचार पीडित मृत मुलीच्या घराच्या बाजूला वाढदिवस साजरा केला जात होता. याच वाढदिवसाला मुलगी गेली असताना तिला संशयिताने निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. रात्री उशिरा झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून साडेअकराच्या सुमारास मुलीच्या घराच्यांनी शोध घेतला असता मुलगी घरापासून दूर काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत (Crime News) आढळून आली. तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Mokhada News
Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म; हिंगोलीत विचित्र प्रकाराने पेच

ग्रामस्थ संतप्त 

सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करत मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला होता. याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी देखील तपास सुरू केला होता. याच दरम्यान आज संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी; या मागणीसाठी मोखाडा शहरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com