Gas Cylinder Blast Saam tv
महाराष्ट्र

Gas Cylinder Blast : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन घरांचे नुकसान; कुटूंबाचा संसार उघड्यावर

Jalgaon News : महिलेने घरात स्वयंपाक करत असताना गॅस संपल्याने नवीन सिलेंडर लावले होते. त्यावरून ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडर लिकेज होऊन त्याचा स्फोट झाल्याने तीन घरांना आग लागली. (Jalgaon) यात तिन्ही घरांचे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. ही घटना मन्यारखेडा (ता.जळगाव) या गावात घडली.  (Maharashtra News)

जळगाव तालुक्यातील मनारखेडे गावात पत्र्याच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा (Gas Cylinder) स्फोट झाला. सकाळी महिलेने घरात स्वयंपाक करत असताना गॅस संपल्याने नवीन सिलेंडर लावले होते. त्यावरून ही आग (Fire) लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. या आगीत आजूबाजूचे अन्य दोन घरांना देखील आग लागली होती. अग्निशनम विभागाला आगीची माहिती देण्यात आली. जळगाव महापालिकेचा अग्निशमन बंबांनी (Fire Brigade) आग विझवली. पण तोपर्यत घरातील संसारोपयोगी वस्तू, महात्वाची कागदपत्रे, कपडे, आणि रोख रक्कम जळून खाक झाले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घर बंद असल्याने जीवितहानी टळली 

सदरची घटना घडली यावेळी तीनही घरे बंद करून कुटुंब कामानिमित्त बाहेर गेलेली होती. त्यामुळे सुदैवाने यात कुणाला दुखापत झालेली नाही. मात्र गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या भीषण आगीत संसार उपयोगी साहित्य वस्तू, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असा ऐवज जळून खाक झाला आहे.  यामुळे तीन जणांचा संसार उघड्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur crime : प्रियकराने प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावलं; अचानक दोघांमध्ये बिनसलं, धारदार शस्त्राने गळाच चिरला

Maharashtra Live News Update: बदलापूर चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणातील मोठी अपडेट

Lipstick Types: डेली वेअर किंवा पार्टीसाठी कोणती लिपस्टिक आहे परफेक्ट?

MLA Harish Daroda: अजित पवारांच्या आमदाराच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू, घोटाळा प्रकरणात होता अटकेत

India Post Recruitment 2026: परीक्षा नाही थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास...

SCROLL FOR NEXT