Sharad Pawar News, Jalgaon Latest News Updates, Sharad Pawar in Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

शरद पवारांच्‍या स्‍वागताला चार क्विंटलचा हार

शरद पवारांच्‍या स्‍वागताला चार क्विंटलचा हार

संजय महाजन

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे आज जळगाव दौऱ्यावर आहे. त्‍यांचे सकाळी जळगावात आगमन झाल्‍यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शरद पवार (Sharad Pawar) यांचे अनोखे स्वागत केले. स्वागतासाठी तब्बल चार क्विंटलचा फुलांचा हार घालून स्‍वागत केले. (jalgaon news Four quintal flower necklace for Sharad Pawar welcome)

चांदसर (ता. धरणगाव) येथे (Jalgaon News) माजी आमदार मुगम पवार यांच्‍या पुतळ्याच्‍या अनावरण कार्यक्रमानिमित्त जळगावात आलेले (NCP) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयाजवळ जल्लोषात व जंगी स्वागत करण्यात आले. ढोल- ताशांच्या गजर, गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण आणि जोरदार घोषणाबाजीत शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी युवक कॉंग्रेसने चार क्विंटल फुलांचा हार अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. (Jalgaon Latest News Updates)

क्रेनच्‍या सहाय्याने उचलला हार

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मध्ये उत्साह चैतन्याचे वातावरण आहे. तब्बल दोन वर्षांनंतर जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तब्बल 50 फुटाचा तसेच चार क्विंटलचा फुलांचा हार बनविण्यात आला आहे. क्रेन मशिनच्या सहाय्याने हा भला मोठा हार टाकून शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT