Dhule: सप्तशृंगीदेवी यात्रौत्सवासाठी जादा बसेस

सप्तशृंगीदेवी यात्रौत्सवासाठी जादा बसेस
MSRTC Bus News, Saptashrungidevi Yatra News Updates, Dhule News Updates
MSRTC Bus News, Saptashrungidevi Yatra News Updates, Dhule News UpdatesSaam tv
Published On

धुळे : कोरोना महामारीमुळे दोन वर्षे श्री सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव होऊ शकला नाही. यंदा निर्बंध शिथिल झाल्यामुळे भाविकांचा यात्रौत्सवाकडे ओढा आहे. यातून एसटी महामंडळाला चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागणीप्रमाणे धुळे (Dhule) आगारातून बसेस सोडण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख अनुजा दुसाने यांनी दिली. (Dhule news Extra buses for Saptashrungidevi Yatra)

MSRTC Bus News, Saptashrungidevi Yatra News Updates, Dhule News Updates
महाआरतीमध्ये गैर काय? आम्ही इतरांसारखे नास्तिक नाही: संदीप देशपांडेंचा टोला

वणी (जि. नाशिक) येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या यात्रेसाठी रविवारपासून (ता. १०) येथील आगारातून जादा बसेस सोडल्या जात आहेत. यातून आगाराला सरासरी २८ ते ३० लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. आता टप्प्याटप्प्याने कर्मचारी कामावर येत आहेत. तसेच कंत्राटी पद्धतीने चालक व वाहकांची भरती झाली आहे. त्यांच्या मदतीने बस सेवा सुरू आहे. कर्मचारी संपामुळे एसटीला (MSRTC Bus) आर्थिक फटका बसला. असे नुकसान भरण्यासाठी प्रयत्न आहेत. (Dhule News Updates)

सकाळी सहापासून नांदुरी गडासाठी बस

श्री सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सव कोरोनामुळे (Corona) साजरा होऊ शकला नाही. निर्बंध हटल्यामुळे यंदा चैत्रोत्सव होत आहे. देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी धुळे आगारातून जादा बसेस सोडण्यात येतील. आठवड्यात सरासरी १४८ बसेस सुटतील. एकूण २९३ फेऱ्या आणि ५७ हजार किलोमीटर प्रवास होण्याची शक्यता असेल. सकाळी सहापासून नांदुरी गडासाठी बस सोडली जात असल्याचे श्रीमती दुसाने यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com