महाआरतीमध्ये गैर काय? आम्ही इतरांसारखे नास्तिक नाही: संदीप देशपांडेंचा टोला

Sandeep Deshpande On Mahavikas Aghadi: पुण्यात होणाऱ्या महाआरतीमध्ये गैर काय आहे? असा सवाल उपस्थित करत त्यांनी "आम्ही काही इतरांसारखे नास्तिक नाहीत" असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.
We are not atheists like some others said mns leader Sandeep Deshpande
We are not atheists like some others said mns leader Sandeep DeshpandeSaam Tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई: मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात वाद सुरू असताना आता हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुण्यात (Pune) महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) सामूहिक पठण देखील होणार आहे. शनिवारी (१६ एप्रिलला) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाष्य केले आहे. पुण्यात होणाऱ्या महाआरतीमध्ये गैर काय आहे? असा सवाल उपस्थित करत त्यांनी "आम्ही काही इतरांसारखे नास्तिक नाहीत" असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे. (We are not atheists like some others mns leader Sandeep Deshpande slams to mva leaders)

हे देखील पहा -

देशपांडे म्हणाले की, आम्ही इतरांसारखे नास्तिक नाही, आम्ही आस्तिक आहोत, आम्ही हिंदु धर्माचे आहोत आम्ही हनुमान चालीसा पठण करणारच असं ते म्हणाले. तसेच जे पदाधिकारी राजीनामा देत आहेत त्यांना कदाचित राज ठाकरे यांची भूमिका पटलेली नाही असं देशपांडे म्हणाले. त्याचप्रमाणे महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार? असा सवाल उपस्थित करत देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन गॅंग असा उल्लेख करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला -

दरम्यान भोंग्याचं राजकारणावरुन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट राज ठाकरेंवर टीका केली होती. 'भोंग्याचे राजकारण करण्यापेक्षा भोंग्यातूनचं महागाई कशी वाढली हे सांगावे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी पाडवा मेळावा घेवून शिवसेनेवर टीका केली होती. त्यांनी भोंग्यावरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. तर शिवसेनेवर मुख्यमंत्री पदावरुन टीका केली होती. यावरुन शिवसेना (Shivsena) व मनसेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

We are not atheists like some others said mns leader Sandeep Deshpande
भोंग्यांवरून वाद पेटण्याची शक्यता; मालेगावच्या मौलानांचा मशिदीवरील भोंगे काढण्यास नकार

मनसेचा पोस्टरबाजीचा प्रयत्न फसला -

शिवसेनेने राज ठाकरेंविरोधात केलेल्या पोस्टरबाजीला आज मनसेनेही पोस्टरद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेचे पोस्टर लागण्याआधीच पोलिसांनी हे पोस्टर ताब्यात घेतले. शिवसेना भवनासमोर पोस्टर मनसेकडून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार, तसेच सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे यांच्या फोटोचे पोस्टर लावण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला, मात्र पोलिसांनी तो डाव हाणून पाडला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com