Nashirabad Nagar parishad 
महाराष्ट्र

नशिराबादला पहिला झेंडा कोणाचा..नगर परिषदेवर असणार १७ नगरसेवक

नशिराबादला पहिला झेंडा कोणाचा..नगर परिषदेवर असणार १७ नगरसेवक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : येथून जवळच असलेल्या नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत झाले आहे. या नगर परिषदेत २०११ च्या जनगणनेनुसार २६ हजार लोकसंख्या आहे. यामुळे १७ नगरसेवक असतील. त्यात ज्यांचे नगरसेवक अधिक निवडून येतील, त्या पक्षाचा नगराध्यक्ष असेल. यामुळे या नगर परिषदेत आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप या तिन्ही पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. (jalgaon-news-first-flag-for-Nasirabad-17-councilors-will-be-on-the-Municipal-Council)

शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तर शिवसेनेचा भगवा नशिराबाद नगर परिषदेवर फडकवूच, असा विश्‍वासही नुकत्याच झालेल्या सभेत व्यक्त केला आहे. नशिराबाद नगर परिषदेवर सध्या प्रशासक म्हणून तहसीलदार नामदेवराव पाटील यांची निवड करण्यात आली. ते सध्या नशिराबादचा कारभार पाहत आहेत.

अशी असेल पदांची रचना

नव्याने स्थापन होणाऱ्या नगर परिषदेत लिपिक टंकलेखक, स्वच्छता निरीक्षक, गाळणी चालक/प्रयोगशाळा सहाय्यक, पंप ऑपरेटर (वीजतंत्री), तारतंत्री, वायरमन, मुकादम व्हॉल्व्हमन ही पदे निर्माण होतील. सोबतच ब श्रेणीतील तीन पदे, क श्रेणीतील बारा पदे अशी एकूण १५ पदे नव्याने निर्माण केली जातील.

अभियंता स्थापत्य, अभियंता विद्युत, अभियंता संगणक, जलदाय, मलनिस्सारण व स्वच्छता, लेखापाल व लेखापरीक्षक, कर निर्धारक, नगररचनाकार व अग्निशमन सेवा अशी पदे मंजूर आहेत. हा पदाचा आकृतिबंध शासनाकडे पाठविला आहे. लवकरच त्यावर निर्णय होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

Cancer Tests: कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून करा 'या' चाचण्या, नाहीतर...; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Dagadu Sapkal: मोठी बातमी! मतदानाच्या ४ दिवसआधी ठाकरेंना जबरी धक्का, मुंबईतील माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेसेनेत

SCROLL FOR NEXT