Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : विमा भरायला पैसे नसल्याने केला ट्रॅक्टर चोरीचा बनाव; खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न फसला

jalgaon News : अमळनेर तालुक्यातील झाडी येथील एकाचे ट्रॅक्टरचे हप्ते थकले होते. विमा मुदत संपायला चार- पाच दिवस बाकी होते. यामुळे ट्रॅक्टर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करायचा आणि विम्याचा फायदा करून घ्यायचा प्लॅन आखला

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : ट्रॅक्टरचा विमा भरायला पैसे नाहीत म्हणून ट्रॅक्टर चोरीला गेल्याचा बनाव केला. या प्रकरणी पोलिसांत खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न संबंधितांकडून सुरु होता. मात्र पोलिसांनी संबंधितांची उलट तपासणी करत हा सर्व प्रकार बनाव असल्याचे समोर आले आहे. यामुळे खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न फसला आहे. 

अमळनेर तालुक्यातील झाडी येथील एकाचे ट्रॅक्टरचे हप्ते थकले होते. विमा मुदत संपायला केवळ चार- पाच दिवस बाकी होते. यामुळे संबंधिताने ट्रॅक्टर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करायचा आणि विम्याचा फायदा करून घ्यायचा प्लॅन आखला. त्यानुसार, त्याने गलवाडे रस्त्यावर जात असताना जेवायला गेलो. नंतर हॉटेलच्यामागे मोकळ्या जागेत शौचालयास गेलो असताना तेथून परत आलो; तर ट्रॅक्टर गायब झाल्याचे दिसले. 

हॉटेलचे बिलही दाखविले 

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाणे अंमलदार विनोद सोनवणे यांच्यासमोर तक्रार देण्यासाठी पुरावा म्हणून हॉटेलचे बिलही सादर केले. त्याचवेळी विनोद सोनवणे यांना याबाबत शंका आल्याने फिर्यादीला खरे सांग म्हणून विचारले असता, तो अजिबात ऐकायला तयार नव्हता. अवघ्या चार- पाच किलोमीटर अंतरावर गाव असताना ट्रॅक्टरचा मालक असलेला शेतकरी हॉटेलमध्ये जेवतो आणि आवर्जुन सोबत बिलही आणतो. त्यामुळे यात काही तरी गडबड आहे, म्हणून हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांनी त्याची उलट तपासणी सुरू केली. 

असा उघड झाला प्रकार 

त्यानुसार, पोलिस कर्मचारी गणेश पाटील हे फिर्यादीला घेऊन ज्या ठिकाणी शौचाला बसला होता, त्या ठिकाणी पाठवले. मात्र, त्यालाशौचाला बसला, ती जागा सापडली नाही किंवा जवळपास कुठेही पाणी सांडल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे त्याला आपली लबाडी उघड पडल्याचे लक्षात आले. यानंतर तो फिर्याद द्यायला आला नाही. पोलिसांच्या सतर्कतेने विम्याची खोटी रक्कम हडपण्याचा प्रयत्न यामुळे फसला. दरम्यान त्याच्या मित्राजवळ ट्रॅक्टर लपवून ठेवल्याची पोलिसांना खात्री झाली. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे खोटा गुन्हा दाखल झाला नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT