Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : कामावरून घरी येताच संपविले जीवन

Jalgaon News : शिरसोली येथे मागील एक वर्षापासून पत्नी, दोन मुले यांच्यासह वास्तव्यास असून समाधान कोळी हे एका खाजगी कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.

Rajesh Sonwane

जळगाव : कंपनीतून रात्रीची ड्युटी करून घरी आल्यानंतर एका इसमाने नैराश्येतून गळफास घेत आत्महत्या केल्याची (Jalgaon) घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची (death) नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील समाधान बंडू कोळी (वय ४०) असे मृत इसमाचे नाव आहे. शिरसोली येथे मागील एक वर्षापासून पत्नी, दोन मुले यांच्यासह वास्तव्यास असून समाधान कोळी हे एका खाजगी कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मागील काही दिवसांपासून ते नैराश्येत होते. दरम्यान २६ मार्चला सकाळी तो कंपनीत नाईट शिफ्ट करून कामावरून घरी आले.  यानंतर दरवाजा बंद करून त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीने आक्रोश केला. यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान कोळी याना (Jalgaon Medical Collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एमआयडीसी (Police) पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

SCROLL FOR NEXT