Mahavitaran News : २० दिवसांत दीड हजार थकबाकीदारांची तोडली वीज; महावितरणची कारवाई

Sambhajinagar News : महावितरणकडून अधिकृत वीज कनेक्शन घेऊन महिन्याकाठी येत असलेले बिल अनेक ग्राहकांकडून नियमित भरले जात नाही. यामुळे थकबाकीचा आकडा वाढत जात आहे.
Mahavitaran News
Mahavitaran NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : महावितरणाचे थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. मार्च एन्ड असल्याने ही कारवाई (Sambhajinagar) अधिक तीव्र करण्यात येत असून ऐन सणासुदीच्या दिवसांत वीज बिल (electric Bill) न भरल्यास वीज कट होऊ शकते. अशाच प्रकारे महावितरणने कारवाई करत मागील २० दिवसात तब्बल दीड हजार थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन कट केले आहे. (Live Marathi News)

Mahavitaran News
Solapur : सोलापूरमध्ये तापमानाचा पारा वाढला, वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण

महावितरणकडून (Mahavitaran) अधिकृत वीज कनेक्शन घेऊन महिन्याकाठी येत असलेले बिल अनेक ग्राहकांकडून नियमित भरले जात नाही. यामुळे थकबाकीचा आकडा वाढत जात आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची (MSEDCL) आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकचे मिळून ७ लाख ५० हजार २५४ ग्राहकांकडे तब्बल ११९ कोटी रुपये वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदारांविरोधात महावितरणने धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान दीड हजाराच्या जवळपास थकबाकीदारांची वीज तोडली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavitaran News
Garlic Rate News: आवक वाढल्याने लसणाच्या दरात घसरण; दर निम्म्याने आले खाली

९८ कोटी वसुलीचे लक्ष्य 

मार्च एन्ड सुरु असल्याने महावितरणने थकबाकीदारांवर कारवाई करत वसुली करण्यास सुरवात केली आहे. आता संभाजीनगर जिल्ह्यात मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर ९८ कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यानुसार महावितरणने मागील २० दिवसांत ५४ कोटी रुपयांची थकवादी वसुली केली आहे. वीज ग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com