Sant Eknath Maharaj Nath Shashti Sohala : नाथषष्ठी निमित्त पैठण सज्ज, वारकऱ्यांच्या वाहनांसाठी प्रत्येक मार्गावर वाहन तळाची व्यवस्था

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा सोहळा येत्या 31 मार्चला संपन्न हाेणार आहे.
sant eknath maharaj nath shashti sohala on 31 march
sant eknath maharaj nath shashti sohala on 31 marchsaam tv
Published On

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याचा पोलिस प्रशासनाकडून नुकताच आढावा घेण्यात आला आहे. पाेलिस प्रशासाने वारकऱ्यांच्या वाहनासाठी प्रत्येक मार्गावर वाहन तळाची व्यवस्था करण्याचे नियाेजन केले आहे. सर्व वारकऱ्यांच्या वाहनांना एकाच वेळेस शहरातील गर्दीच्या प्रसंगात थेट गावात जाता येणार नाही असेही नियाेजन करण्यात आल्याचे पाेलिसांनी नमूद केले. (Maharashtra News)

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त पोलिस प्रशासनाकडून यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला आहे. येत्या 31 मार्चला नाथषष्ठी यात्रा सोहळा होणार आहे.

sant eknath maharaj nath shashti sohala on 31 march
Risod Krushi Utpanna Bazar Samiti : 'चिल्लर' कारणामुळं वाशिमपाठोपाठ रिसोडचीही बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

या सोहळ्याला राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर वारकरी भाविक आपल्या वाहनांसह पैठण नगरीत येतात. त्यामुळे सर्व वारकऱ्यांच्या वाहनांना एकाच वेळेस शहरातील गर्दीच्या प्रसंगात थेट गावात जाता येणार नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनांसाठी पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक मार्गावर वाहन तळाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान या यात्रेवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

sant eknath maharaj nath shashti sohala on 31 march
Karanjali Ghat Traffic Update : करंजाळी घाटात दाेन्ही बाजूची वाहतुक ठप्प, पाच तासांपासून बंद पडलेला ट्रक हटविण्याची कार्यवाही सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com