हिंगोली : आईसोबत कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना आज सकाळी घडली. (Hingoli) हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील अंजनणवाडी शिवारात ही घटना घडली असून पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध सुरु आहे. (Tajya batmya)
सुनिता गंगाधर दराडे (वय १२) असे बुडून मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील अंजनणवाडी परिसरात असलेल्या कालव्यात गावातील अनेक महिला सकाळी कपडे धुण्यासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे सुनीता दराडे ही आईला मदत म्हणून कपडे धुण्यासाठी कालव्याच्या पाण्याच्या ठिकाणी गेली. दरम्यान आई कपडे धुवत असताना सुनीता हि पाण्यात उतरली होती. यात पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुलगी बुडत असल्याचे पाहिल्यानंतर आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचविता आले नाही. आईने आरडाओरड केल्यानंतर काहीजण तेथे धावून आले. तसेच गावात ही बातमी समजताच ग्रामस्थ घटनास्थळी आले. यानंतर बुडालेल्या मुलीचा शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान मुलगी बुडाल्याने आईने एकच आक्रोश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.