Jalgaon News power Theft Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वीजचोरी पडली महागात; न्‍यायालयाने ठोठावली दंडासह सक्त मजुरीची शिक्षा

वीजचोरी पडली महागात; न्‍यायालयाने ठोठावली दंडासह सक्त मजुरीची शिक्षा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : भडगाव तालुक्यातील वीज चोरीच्या गुन्ह्यात संशयीतावर दोषारोप सिद्ध होवुन जिल्‍हा न्यायालयाने (Court) सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधिश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयाने १ वर्षे सक्त मजुरीसह दहा हजारांचा दंडही बजावला आहे. (Breaking Marathi News)

डोंगरगाव (ता. भडगाव) शिवारात राहणारे पंजाबराव धनराज देशमुख यांनी पोल्ट्रीफार्म हाऊस येथे मका दळण्याच्या गिरणीवर महावितरण (Mahavitaran) कंपनीतर्फे मीटर लावण्यात आली. या गिरणीवरील वायर कट करून त्यामधून सुमारे ४४ हजार ३७५ युनिट म्हणजेच २ लाख ९३ हजार ७२० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता अभय मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (Chalisgaon) चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २९ डिसेंबर २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालवण्यात आला.

सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी सहाय्यक अभियंता अभय पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. देान्ही बाजुंचा प्रदिर्घ युक्तीवाद प्राप्त पुरावे, परिस्थीतीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षवरून पंजाबराव धनराज देशमुख यांच्यावर दोषारोप सिद्ध झाल्याने भारतीय विद्युत कायदा कलम- २००३ चे कलम- १३५ अन्वये १ वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ३ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच आरोपीने २ लाख ९३ हजार ७२० रुपये रक्कम महावितरण कंपनीला १ महिन्याच्या आत भरावी असा हुकूम देण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. वैशाली महाजन यांनी कामकाज पाहिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गोसावी यांनी सहकार्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT