बदलापूर : बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग सुरू करण्यात येत आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास होत असून याविरोधात आज (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण (Mahavitaran) अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले. हे अघोषित लोडशेडिंग बंद न केल्यास महावितरण विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाविकास आघाडीकडून देण्यात आला. (Tajya Batmya)
बदलापूर (Badalapur) शहरात गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. शहराचा वेगवेगळ्या भागात अनेक तास कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जातो. याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तर वृद्ध, विद्यार्थी यांनाही याचा मनस्ताप होतो. याबाबत बदलापूरमधील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव आणि ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसह महावितरणच्या सोनिवली कार्यालयात धडक दिली.
ठाणे, डोंबिवलीत लोडशेडींगचे आव्हान
अघोषित लोडशेडिंग बंद करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली. तसेच लोडशेडिंग बंद न झाल्यास भविष्यात महावितरण विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडीकडून देण्यात आला. यावेळी तुमच्यात हिंमत असेल, तर ठाणे किंवा डोंबिवलीत लोडशेडिंग करून दाखवा, असं आव्हान देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिलं. यावर कल्याण विभागीय कार्यालयात होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल, असं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.