Karad News: शेततळ्यात बुडून महिलेसह दोन बालिकांचा मृत्यू; सहा जणांना वाचविण्यात यश

शेततळ्यात बुडून महिलेसह दोन बालिकांचा मृत्यू; सहा जणांना वाचविण्यात यश
Karad News
Karad NewsSaam tv

कराड : कराड तालुक्यातील पाडळी येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या तिन जणांचा बुडून (Death) मृत्यू झाला. यात महिलेसह (Karad) दोन लहान मुलींचा समावेश आहे. सदर घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. (Live Marathi News)

Karad News
RTE Admission: खासगी शाळांकडून जबरदस्‍ती शुल्‍क वसुली; पालकांकडून तक्रार

पाडळी (ता. कराड) येथे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रागिणी रामचंद्र खडतरे (वय ४), वैष्णवी गणेश खडतरे (वय १५) व शोभा नितीन घोडके (वय ३२) यांच्‍यासह अन्‍य काहीजण पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याच्‍या खोलीचा अंदाज न आल्‍याने मुली बुडू लागल्‍या. त्‍यांना वाचविण्यासाठी काहीजण गेली. परंतु, यश मिळाले नाही.

Karad News
Pune Crime News: हप्‍ता न दिल्‍याने कुटुंबाला मारहाण

परिसर हादरला

शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे नऊ ते दहा जण गेले होते. यावेळी तिघी जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर सहा जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेने संपूर्ण पाडळी परिसर हादरुन गेला. या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com