Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse : विजय दिसत नसल्याने विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे; एकनाथ खडसे

Jalgaon News : जळगावच्या रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्या सरळ लढत आहे.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मतमोजणीच्या सहाव्या फेरी अखेर रक्षा खडसे यांना ७४ हजार मतांनी लीड मिळाली असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळेच ते आरोप करत असून विरोधकांचा हा रडीचा डाव सुरु असल्याची प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी दिली आहे.

जळगावच्या (Jalgaon) रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्या सरळ लढत आहे. दरम्यान आज मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून भाजपच्या रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे. या दरम्यान महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत मतमोजणी थांबविली आहे. यावर एकनाथ खडसे (eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

रावेर (Raver) लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. रक्षा खडसे यांना सहाव्या फेऱ्यानंतर ७४ हजारचा लीड मिळत आहे. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे; म्हणून ते काही आरोप करत सुटले आहेत. रक्षा खडसे यांच्या विजयाचे चित्र दिसत आहे; म्हणून हा रडीचा डाव विरोधक खेळत आहेत; अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Officer Transfer: मोठी बातमी! १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे झाली नियुक्ती?

Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

Thursday Horoscope : या 4 राशींसाठी मंगळवार ठरणार खास! पैसा, नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी

SCROLL FOR NEXT