Baramati Lok Sabha : बारामतीत शरदचंद्र पवार गटाचा जल्लोष; सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

Baramati News : लोकसभेच्या निवडणकीत बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय लढाई रंगली होती. यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून होते
Baramati Lok Sabha
Baramati Lok SabhaSaam tv

बारामती : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागत असून महाराष्ट्रातील बारामती लोकसभा निवडणुकीकडे लक्ष लागून होते. यात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. रस्त्यावर फरक फोडून जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. 

Baramati Lok Sabha
Lok Sabha Election Result : नंदुरबारमध्ये काँग्रेसचे पाडवी आघाडीवर, रावेरमधून रक्षा खडसेंची आघाडी

लोकसभेच्या निवडणकीत बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय लढाई रंगली होती. यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून होते. मात्र आज जाहीर होत असलेल्या निकालामध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे समजतात (Baramati) बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. 

Baramati Lok Sabha
Dhule Nandurbar Lok Sabha : धुळ्यातून भामरेंनी घेतली आघाडी, नंदुरबारमध्ये हिना गावित पिछाडीवरच

सकाळपासून निकाल हाती लागल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी कारकर्त्याची गर्दी झालेली पाहण्यास मिळत होती. मात्र जसजसा निकाल जाहीर होऊ लागला त्यानुसार कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली होती. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ! (Supriya Sule) सुप्रिया सुळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com