Jalgaon Heat Stroke Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Heat Stroke: पाळधीत उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; जिल्‍ह्यातील दुसरा बळी

पाळधीत उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; जिल्‍ह्यातील दुसरा बळी

साम टिव्ही ब्युरो

पाळधी (जळगाव) : गेल्‍या काही दिवसांपासून सुर्य आग ओकत आहे. यामुळे (Temperature) तापमान ४२ अंशाच्‍यावर पोहचले आहे. याचा अनेकांना त्रास होत आहे. यात पाळधी येथील (Farmer) शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी घडली. (Latest Marathi News)

राज्‍यात उष्‍णतेची लाट पसरली आहे. राज्‍यातील अनेक शहरांमधील तापमान हे ४२ अंशाच्‍यावर पोहचले आहे. तापमान वाढीमुळे सकाळी दहा वाजेपासूनच उष्‍णतेच्‍या झळा जाणवत आहेत. दरम्‍यान मंगळवारी जळगाव जिल्‍ह्यातील तापमानाचा पारा हा ४५ अंशावर पोहचला होता. यामुळे तिव्र उन्‍हाच्‍या झळा असह्य झाल्‍या. उष्‍णतेचा त्रास होवून शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्‍यू झाला. जिल्‍ह्यात यंदा उष्माघाताचा दुसरा बळी आहे.

शेतातून आले अन्‌

पाळधी (ता. धरणगाव) येथील शेतकरी शांताराम बुधा भराडी (वय ४०) यांची दोन बिघे शेती आहे. ते मंगळवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारी घरी आल्यानंतर त्यांची तब्येत अचानक खराब झाली. उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT