Corona saam tv
महाराष्ट्र

Corona: तिसऱ्या लाटेला महिनाभरातच ‘ब्रेक’; कोरोनाचा आलेख उतरता

तिसऱ्या लाटेला महिनाभरातच ‘ब्रेक’; कोरोनाचा आलेख उतरता

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्यातील व देशातील प्रमुख शहरांमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाची तिसरी लाट येऊन महिनाभरात ओसरू लागली. तशी जळगाव जिल्ह्यातही जानेवारीपासून तिसरी लाट सुरू होऊन महिनाभरात त्याला ‘ब्रेक’ लागला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत (Corona) चारशेवर दैनंदिन रुग्णांची संख्या असताना आता ती दोन- अडीचशेपर्यंत खाली आली आहे. (jalgaon news corona third wave breaks within a month)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली. सुरवातीला जळगाव शहरासह (Jalgaon Corona Update) भुसावळ हॉटस्पॉट ठरु लागले व रुग्णही वाढले. गेल्या आठवड्यापर्यंत या दोन्ही शहरांमधील दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत होती. दोन्ही ठिकाणी दररोज शंभर, दीडशेवर रुग्ण समोर येत होते. आणि जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या व ग्रामीण ठिकाणी रुग्ण स्थिर होते.

बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

या आठवड्यात जळगाव, भुसावळातील (Bhusawal) दररोजची रुग्णसंख्या घटत आहेत. तर दररोज बरे होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अन्य ठिकाणी, म्हणजे विशेषत: चोपडा, अमळनेर, चाळीसगाव व जामनेर तालुक्यात दररोजचे रुग्ण वाढत आहेत. आठवडाभर अशीच स्थिती राहून जिल्ह्यात सर्वच ठिकाणचे रुग्ण घटू लागतील. त्यामुळे महिनाभरात तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरु लागल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.

अशी आहे आठवड्यातील स्थिती

तारीख---- नवे रुग्ण--- बरे झालेले

२४ जाने----३४४-----१५७

२५ जाने----४८९-----३४९

२६ जाने ----२८१----२१६

२७ जाने----३३८-----४०९

२८ जाने----३७४------४६८

२९ जाने----२६८-----४५१

३० जाने----२०६-----४२३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT