एकतर्फी प्रेम 
महाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून मुलीला रस्‍त्‍यात गाठले अन्‌

एकतर्फी प्रेमातून मुलीला रस्‍त्‍यात गाठले अन्‌

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गावातीलच मुलीवर तरुणाचे एकतर्फी प्रेम होते. अनेकदा मुलीचा पाठलाग करायचा. परंतु, त्‍याने पुढचे पाऊल टाकत हद्दच गाठली. एकतर्फी प्रेमातून त्‍याने अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून विनयभंग केला. इतकेच नाही तर तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली. (jalgaon-news-boy-one-sided-love-the-girl-reached-the-road)

बांभोरी (ता. धरणगाव) येथील कुलदीप रवींद्र सपकाळे याचे काही दिवसांपासून गावातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या प्रेमातूनच प्रेमातून तो मुलीचा अनेकदा पाठलाग करायचा. मात्र मुलगी आपल्‍या मैत्रीणीसोबत बाहेर गेली असतानाची संधी साधत कुलदीपने मुलीला रस्‍त्‍यात गाठून धमकी दिली. या प्रकारानंतर मुलीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली असून विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तर तुला जिवंत ठेवणार नाही

गुरुवारी पीडित मुलगी मैत्रिणीसोबत कामानिमित्त बाहेर गेली होती. दोन्ही मुली अग्रवाल चौकातून जात असताना कुलदीप सपकाळे याने मुलीला रस्‍त्‍यात गाठले. यावेळी त्‍याने ‘फक्त माझी आहेस, तू जर माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ या शब्दांत शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच पीडित मुलीच्या मैत्रिणीला देखील अश्लील शिवीगाळ केली आहे. दोघींना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT