Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : बैलगाडी उलटून मुलाचा मृत्यू; लोखंडी विळ्याचा डोक्याला लागला मार

Jalgaon News : वडिलांनी गुरांसाठी चार काढून बैलगाडीत भरला होता. हा चार घेऊन गौरव हा घरी निघाला होता

Rajesh Sonwane

जळगाव : शेतातून बैलगाडीतून चारा घेऊन घरी जात असताना बैलगाडी उलटली. या दुर्घटनेत बैलगाडीत (Jalgaon) असलेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. गौरव आनंदा पाटील (वय १३) असे मृत (Death) झालेल्या मुलाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

जळगाव तालुक्यातील वाकडी येथे गौरव हा वडील आनंदा पाटील, आई ज्योती पाटील यांच्यासह वास्तव्यास होता. गौरव हा आई- वडिलांना शेती कामात मदत करायचा. नेहमीप्रमाणे तो ११ मार्चला देखील शेतात गेला होता. वडिलांनी गुरांसाठी चार काढून (Bullock Cart) बैलगाडीत भरला होता. हा चार घेऊन गौरव हा घरी निघाला होता. दरम्यान शेताच्या बांधावरून जात असताना चाक खाली- वर असल्याने चाऱ्याच्या वजनामुळे बैलगाडी उलटली. यात गौरव देखील फेकला गेला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैलगाडी उलटल्यावर गौरव चाऱ्याखाली दाबला गेला. तो तेथून निघण्याचा प्रयत्न करत असतानाच पडलेले दोन्ही बैल देखील उठण्यासाठी झटापट करत होते. यामुळे चाऱ्यात अडकवलेला विळा गौरवच्या डोक्यात खोल घुसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? रोज नाश्त्याला खा 'हा' १ पदार्थ, हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

Dhaba Style Dal Tadka Recipe: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाइल तूर डाळ तडका, वाचा सोपी रेसिपी

Hair Care: शॉवरनंतर केसांची अशी घ्या काळजी; ओले केस गळणे आणि तुटणे होईल कमी

Maharashtra News Live Update: हिंगोलीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

SCROLL FOR NEXT