Jalgaon Parola News: नव्याने सुरु झालेला टोलनाका जाळला; पारोळ्याजवळील घटना

Jalgaon Parola Toll Plaza News: नागपूर- मुंबई महामार्गाचे तरसोद ते फागणे दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. काही भागातील काम पूर्ण झाले असून या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आला आहे.
Jalgaon's Parola Toll Plaza
Jalgaon's Parola Toll PlazaSaam tv
Published On

Jalgaon Parola Toll Naka News

तरसोद ते फागणे या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या महामार्गावर पारोळा (Parola) शहरापासून काही अंतरावर सबगव्हाण खुर्द येथे टोल नाका सुरु करण्यात आला असून या तोल नाक्यावरील कॅबिन जाळून टाकण्याचा प्रकार घडला आहे. (Live Marathi News)

Jalgaon's Parola Toll Plaza
Gondia News : १२ तास वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; १५ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूर- मुंबई महामार्गाचे (Jalgaon) तरसोद ते फागणे दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. काही भागातील काम पूर्ण झाले असून या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आला आहे. या मार्गावरील पाळधी ते तरसोद बायपासचे काम अद्याप बाकी आहे. असे असताना पारोळ्याजवळ उभारण्यात आलेला हा (Toll Plaza) टोल नाका १० मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. अशा प्रकारे तोल नाका सुरु करणे चुकीचे असून टोलचे दर हे सर्वसामान्य वाहनधारकांना परवडणारे नाहीत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon's Parola Toll Plaza
Wardha Cyber Crime : ऑनलाइन फसवणुकीचा नवा फंडा; मुलगा गंभीर गुन्ह्यात, पोलिस असल्याची बतावणी करत पैशांची मागणी

दुसऱ्याच दिवशी जाळले कॅबिन 

दरम्यान, टोल नाका सुरु होण्यास एक दिवस झाला असून आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास विना क्रमांकाच्या कारमधून आलेल्या टोळक्याने टोलनाक्याच्या कॅबिनमध्ये पेट्रोल टाकून कॅबिन पेटवून दिली. यानंतर त्यांनी दुसऱ्या कॅबिनसह अन्य भागांची तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याची माहिती मिळताच टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com