बोदवड (जळगाव) : बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आज झालेल्या नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत शिवसेना उमेदवार आनंदा पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांच्या निवडीनंतर शिवसेनेतर्फे (Shiv Sena) जल्लोष करण्यात आला. (jalgaon news Bodwad Nagar Panchayat Shiv Sena Ananda Patil as the mayor)
बोदवड (Bodwad) नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा पार करता आला नसून अवघ्या सात जागा राखता आल्या आहेत. यामुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष नक्की होता. तरी विरोध म्हणून योगिता खेवलकर यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादीकडून (NCP) दाखल करण्यात आला होता. मात्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी गटनेते आनंदा पाटील यांची वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी तर सहाय्यक नगरपंचायत मुख्य अधिकारी आकाश डोईफोडे यांनी काम पाहिले.
स्पष्ट बहुमत
नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आनंदा पाटील यांना १७ पैकी शिवसेनेचे ९ व (BJP) भाजपचे १ अशी १० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या योगिता खेवलकर यांना राष्ट्रवादीचे ७ मते मिळल्याने त्यांचा पराभव झाला. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या रेखा गायकवाड यांना देखील 10 मते मिळवत विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे मुज्जमिल शहा यांना 7 मते मिळवत पराभव स्वीकारावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.