Dhule Congress
Dhule Congresssaam tv

Dhule: पंतप्रधानांच्‍या विधानाचे पडसाद; कॉंग्रेसचे शरम करो आंदोलन

पंतप्रधानांच्‍या विधानाचे पडसाद; कॉंग्रेसचे शरम करो आंदोलन
Published on

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद धुळ्यात उमटले आहेत. या विरोधात खासदार सुभाष भामरे यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसतर्फे (Congress) आंदोलन करण्यात आले. (dhule news repercussions of the PM modi statement Shame on the Congress movement)

Dhule Congress
शस्‍त्रक्रीया झालेल्‍या आईची भेट घेवून परतणाऱ्या मुलाचा अपघाती मृत्यू

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्र बद्दल केलेल्या विधानाचे पडसाद धुळ्यात (Dhule) उमटताना दिसून आले. माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्यावतीने शरम करो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी खासदार सुभाष भामरे यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित होते.

केंद्रातील भाजपवर निशाणा

केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक झळकवत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेसच्यावतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली असून, भाजपचा (BJP) केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्राला (Maharashtra) बदनाम करण्याचा कट कारस्थान करण्यात येत असल्याचा आरोप देखील यावेळी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी भाजपवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानाबाबत भाजपने माफी मागावी अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com