जळगाव : ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारे ऑनलाईन (Jalgaon) ट्रेडींगच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार जळगावात समोर आला आहे. या प्रकारात एकाची तब्बल १२ लाख ६७ हजार रुपयात फसवणूक (Fraud) झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
जळगाव शहरातील आदर्शनगरमधील रहिवासी असलेले योगेश वसंत हेबाळकर (वय ५४) हे एका खासगी कंपनीच्या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. दरम्यान योगेश हेबाळकर यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून त्यांना ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. समोरच्यांनी दिलेल्या आमिषाला (Cyber Crime) बळी पडत हेबाळकर यांनी होकार दर्शविला. यानंतर त्यांच्याकडून १८ डिसेंबर २०२३ ते ७ मार्च २०२४ यादरम्यान वेळोवेळी एकूण १२ लाख ६७ हजार ५०० रुपये ऑनलाईन पद्धतीने विविध बँक खात्यात स्वीकारले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र गुंतवणूक केलेल्याचा त्यांना कोणताही नफा, मोबदला न देता मुद्दल रक्कमही दिली नाही. वारंवार पाठपुरावा करून आपली रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हेबाळकर यांनी ६ एप्रिलला पोलिसात फिर्यादीवरून जळगाव (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.