Muktainagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Muktainagar Crime : जळगाव हादरले; जमिनीच्या वादातून चुलत भावाची हत्या

Jalgaon News : सुनील व त्याचा चुलतभाऊ प्रवीण जगन चव्हाण यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून शेतीच्या जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद पुन्हा उफाळून आल्याने वादातूनच सदर घटना घडल्याचे समोर आले

Rajesh Sonwane

जळगाव : वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीवरून जुना वाद होता. हा वाद उफाळून आल्याने चुलत भावाने हत्याराने वर करत आपल्या भावाची हत्या केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी शिवारात समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील सुनील रामसिंग चव्हाण (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील चव्हाण हा शेती आणि मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान सुनील व त्याचा चुलतभाऊ प्रवीण जगन चव्हाण यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून शेतीच्या जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद पुन्हा उफाळून आल्याने वादातूनच सदर घटना घडल्याचे समोर आले आहे. 

जेवणासाठी बाहेर गेला परतलाच नाही 

दरम्यान २५ मार्चला सायंकाळी सुनील मित्रांसोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र जेवणासाठी बाहेर गेला असता सुनील घरी परतलाच नाही. यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत सापळुन आला नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता सुमारास सुनील चव्हाण यांचे नातेवाईक रस्त्यावरून येत असताना टाकळी शिवारात सुनिल चव्हाण यांचा दुचाकीजवळ मृतदेह आढळून आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल 
शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांना आला. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जात पंचनामा केला. तर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मयत सुनील चव्हाण यांचा भाऊ संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी महानगरपालिका निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT