Son Declares Living Mother Dead Withdraws Money Saam
महाराष्ट्र

"मी जिवंत आहे हो....!" सिद्ध करण्यासाठी वृद्धेची परवड; दहा लाख घेऊन मुलगा पसार

Son Declares Living Mother Dead Withdraws Money: जळगाव जामोद नगर परिषदेता भोंगळ कारभार उघड. जिवंत महिलेला मृत घोषित करून प्रमाणपत्र जारी केलं.

Bhagyashree Kamble

संजय जाधव, साम टिव्ही

जळगावच्या जामोद शहरातून प्रशासनाचा भोंगळ प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही शहानिशा न करता नगर परिषदेने जिवंत वृद्ध महिलेला मृत घोषित करत मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं. या प्रमाणपत्राचा गैरवापर त्यांच्या मुलाने केला. त्यानं आईच्या बँक खात्यातील तब्बल दहा लाथ रूपये काढून घेत पसार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रेमसिंह कमल सिंह राजपूत या मुलाने आपली आई कौशल्याबाई राजपूत यांचा ५ ऑक्टोबर २०२३ रोजी मृत्यू झाल्याचे खोटे स्वयंघोषणापत्र २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत सादर केले. जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहनिशा न करता जिवंत वृद्धेच्या मृत्यूची नोंद केली. तसेच प्रमाणपत्रही मुलाला देऊन टाकले.

प्रेमसिंह राजपूती याने आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे, आईच्या बँक खात्यातील ठेव रक्कम, तब्बल दहा लाख रूपये काढून घेतले. तसच काही वेळानंतर पसार झाला. ही बाब ज्यावेळी जिवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली, तेव्हा त्यांनी नगरपरिषदेत स्वतःच्याच मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. धक्कादायक बाब म्हणजे नगर परिषदेने कौशल्याबाईंना जिवंत असतानाच त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देऊन टाकले.

यानंतर वृद्ध महिलेनं बँकेच चौकशी केली. तेव्हा खात्यातील संपूर्ण रक्कम मुलाने काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर कौशल्याबाईंना धक्का बसला. स्वतःचे घर विकून जमा केलेली रक्कम गमावल्याने, त्या सध्या एकचे जिवन जगत आहेत. दरम्यान, आपण जिवंत आहोत, हे सिद्ध करण्यासाठी कौशल्याबाईंना मृत्यू प्रमाणपत्र हातात घेऊन पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रार देऊनही पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.

या संपूर्ण प्रकरणामुळे जळगाव जामोद नगर परिषदेचा भोंगळ आणि बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जिवंत असल्याचे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विक्री करणारी टोळी जेरबंद, अशी अडकली जाळ्यात

Iran–Israel War: इराण-इस्रायल युद्धामुळे रायगडमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची धास्ती

SCROLL FOR NEXT