Jamner Crime News
Jamner Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jamner Crime News : पत्नी व अकरा महिन्याच्या चिमुकलीची हत्या; गावी येत पतीनेही संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

जामनेर (जळगाव) : पती आणि पत्नीमध्ये रोजच वाद होत होते. याच वादातून पतीने पत्नीसह अकरा महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली. यानंतर पतीने दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन (Jalgaon) जीवनयात्रा संपविली. हि धक्कादायक घटना जामनेर (Jamner) तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे १२ एप्रिलला घडली. (Breaking Marathi News)

देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) येथील पोलिस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी झाला होता. पतीला मद्याचे व्यसन असल्यामुळे पती- पत्नीमध्ये नेहमी (Crime News) वाद होत. परंतु पतीचे दारूचे व्यसन जास्तच झाल्यामुळे प्रतिभा पतीला सोडून अकरा महिन्याच्या मुलीला सोबत घेऊन माहेरी निघून आली होती. मध्यंतरी विशालने प्रतिभाची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु प्रतिभाने त्यास नकार दिला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल प्रतिभाला घेऊन जाण्यासाठी व तिची समजूत काढण्यासाठी आला असता प्रतिभाने नकार दिला. या मुळे दोघांमध्ये वाद झाला. यातून विशालने धारदार शस्त्राने प्रतिभा व मुलगी दिव्या या दोघींचा गळा चिरून हत्या करून तिथून फरार झाला. प्रतिभाच्या आई, वडिलांना माहिती मिळताच त्यांनी घरी धाव घेतली. त्यांना आपली मुलगी व नात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिसून आले.

गावी येत घेतली विहरीत उडी 

पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करून पती विशाल हा आपल्या मूळ गावी दुधगाव येथे आला. यानंतर कमरेला दगड बांधून त्याने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. या सर्व घटनेचा तपस फत्तेपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश फड आणि तडवी आदी तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदी मुंबईत विविध ठिकाणी भेट देणार

Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

Mahadev Betting Case Update: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT