Dharangaon News Saam tv
महाराष्ट्र

Dharangaon News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन 

Jalgaon News : सासरची मंडळी २०१३ पासून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या जाचाला कंटाळून शीतल यांनी गावातीलच संतोष चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी मारत आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

धरणगाव (जळगाव) : लग्नाला दहा वर्षाचा कालावधी झाला असताना सासरच्या मंडळींकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना (Dharangaon) धरणगाव तालुक्यातील अनोरे येथे घडली आहे. या घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी पतीला चांगलाच चोप दिला आहे. (Tajya Batmya)

शीतल संतोष पाटील (वय ३४) असे मयत विवाहितेचे नाव आहे. वाडी भोकर (जि. धुळे) (Dhule) येथील माहेर असलेल्या शीतल पाटील यांचा २०१३ मध्ये धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील संतोष हिरामण पाटील यांच्याशी विवाह झाला होता. मात्र सासरची मंडळी २०१३ पासून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या जाचाला (Jalgaon) कंटाळून शीतल यांनी गावातीलच संतोष चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी मारत आत्महत्या केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शीतल यांनी आत्महत्या केल्याची माहिती माहेरच्यांना मिळाल्यानंतर अनोरे येथे येत पती संतोष पाटील यास मारहाण केली. यावेळी काहींनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला. तसेच या प्रकरणी कौतिक भिवसन पाटील यांच्या फिर्यादीवरून पती संतोष हिरामण पाटील, सासू राजपुरबाई हिरामण पाटील, सासरे हिरामण अभिमन पाटील (Police) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सय्यद करीम तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT