Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त

Mumbai Cyber Crime Branch : मुंबईच्या मध्य विभाग सायबर पोलिसांनी 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश करत सात आरोपींना अटक केली आहे.आरोपींकडून १० लाखांची रोकड, १६ मोबाईल, २३ सिमकार्ड आणि बँक खात्यांशी संबंधित मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्राथमिक तपासात या खात्यांचा संबंध देशभरातील ६८ हून अधिक सायबर गुन्ह्यांशी असल्याचे समोर आले आहे.
Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त
Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्तchatgpt
Published On

सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'म्युल अकाउंट' (Mule Account) रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या मध्य विभागातील सायबर पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला असून या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे १० लाख रुपयांची रोकड, १६ मोबाईल फोन, २३ सिमकार्ड, विविध बँकांची चेकबुक, खाते उघडण्यासाठी वापरण्यात येणारी कागदपत्रे, विविध कंपन्यांचे शिक्के, बँक अकाउंट किट तसेच कॅश काउंटिंग मशीन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांना २९ जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोरीवली पश्चिम येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेत सायबर फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बँक खात्यांमधून रोख रक्कम काढली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींच्या कार्यालयांवर आणि ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात आणखी पुरावे हस्तगत करण्यात आले.

Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त
भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

या कारवाईत सलमान हवाबी पठाण (३४), साजिद निशार अहमद कोटावाला (४६), विराज केतन टायमणी (३७), सय्यद वजाहत वाहिदुद्दीन (४१), राकेश रामाशंकर मिश्रा (४२), सत्यदेव राजेंद्र हंगे (३५) आणि आनंद निलेश ठाकूर (२७) या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात आरोपी विविध कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडून ती सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून देत असल्याचे उघड झाले आहे. या खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीतून आलेली रक्कम वळविण्यासाठी केला जात होता. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या बँक खात्यांचा संबंध देशभरातील ६८ हून अधिक सायबर गुन्ह्यांशी असल्याची माहिती तपासात समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.

Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त
परवानगी १४ ची, बांधले २१ मजले! केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची अशी झाली पोलखोल

याप्रकरणी वरळी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मध्य विभाग सायबर पोलिसांनी केली. दरम्यान, नागरिकांनी कोणालाही बँक खाते वापरण्यास देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, बँक खाते, पॅन, आधार, ओटीपी किंवा पिन यांसारखी गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नये, तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने १९३० हेल्पलाइन किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com