Cyber crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber crime : डॉक्टराची ऑनलाईन फसवणूक; सैन्यदलातील जवानांच्या तपासणीच्या नावे सव्वा लाखात गंडविले

Jalgaon News : जळगावातील डॉ. सुजाता प्रमोद महाजन यांची एक लाख २४ हजार ९९२ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे

Rajesh Sonwane

जळगाव : सायबर गुन्हेगार ऑनलाईन फसवणूक करण्याचे वेगवेगळे प्रकार अमलात आणत आहेत. यात भारतीय सैन्य दलातील जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे सांगून जळगावातील महिला डॉक्टराची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगावातील (Jalgaon) डॉ. सुजाता प्रमोद महाजन यांची एक लाख २४ हजार ९९२ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. गांधीनगरात डॉ. सुजाता महाजन यांचे हॉस्पिटल असून त्यांना २० मेस अनोळखी क्रमांकावरून फोन आला. यावेळी समोरच्याने सैन्य दलातील अधिकारी बोलत असल्याचे सांगत तुमच्याकडे जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने व्हिजिटिंग कार्ड (Cyber Crime) मागविले. दुसऱ्या दिवशी डॉ. प्रमोद महाजन यांना ४० ते ५० जवानांची तपासणी करायचे त्याने असल्याचे सांगितले. 

यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फोन पे क्रमांक मागितला. त्यानुसार डॉ. प्रमोद महाजन यांनी पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन-पे क्रमांक दिला. बोलणे सुरू असताना, फोन-पेवर डॉ. सुजाता महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होऊ लागले. मात्र काही वेळातच त्यांच्या खात्यातून एक लाख २४ हजार ९९२ रुपये विड्रॉल करण्यात आले. याबाबत डॉ. सुजाता महाजन यांनी १० जूनला दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ (Police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CRPF मध्ये होणार मोठा बदल; ३० वर्षांनंतर 'लान्स नायक' आणि 'नायक' पदे पुन्हा होणार सुरू, किती असते सॅलरी?

रिसॉर्टला भीषण आग! 10 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जखमी

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला प्रतिसाद; शेतकरी मदतीवरून एकनाथ शिंदेंचा सवाल

विधिमंडळाचे उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्षांच्या अधिकारांना कात्री; लोकशाहीच्या मंदिरात संघर्ष पेटला

Car Cabin Air Filter: कारची एसी फुल्ल, पण कुल होत नाही, केबिन फिल्टर कधी बदलावा?

SCROLL FOR NEXT