Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : इंटरनेटवर संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; दहा लाखात ऑनलाईन फसवणूक

Jalgaon News : जामनेर येथील प्रा. विश्वेष बाविस्कर यांचे वडील प्रदीप बाविस्कर यांना छत्रपती संभाजीनगरातील एका रुग्णालयात दाखल करायचे होते

Rajesh Sonwane

जळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशातच वडिलांच्या उपचारासाठी रुग्णालयात नोंदणीसाठी इंटरनेटवरुन संपर्क क्रमांक मिळविणे जामनेरच्या खासगी शिकवणी घेणाऱ्या प्रा. विश्वेष प्रदीप बाविस्कर यांना चांगलेच महागात पडले आहे. यात त्यांची १० लाख रुपयात फसवणूक झाली आहे. 

जामनेर (Jamner) येथील प्रा. विश्वेष बाविस्कर यांचे वडील प्रदीप बाविस्कर यांना छत्रपती संभाजीनगरातील एका रुग्णालयात दाखल करायचे होते. त्याबाबत नाव नोंदणीसाठी रुग्णालयाचा क्रमांक इंटरनेटवर शोधला. त्यानंतर त्यांना डॉ. राकेश असे नाव सांगणाऱ्याने त्यांच्याशी संपर्क केला. नाव नोंदणीसाठी त्यांना एक फाईल पाठविली. सोबतच बाविस्कर यांचे बँक खाते क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक व सीव्हीव्ही क्रमांक अशी सर्व माहिती त्या व्यक्तीने घेतली. 

बाविस्कर यांनी सर्व माहिती भरून दिल्यानंतर बाविस्कर यांच्या खात्यातून (Cyber Crime) दहा लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विश्वेष बाविस्कर यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: दीपक केसरकरांसाठी मुख्यमंत्र्यांंच्या सूनबाई मैदानात

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

SCROLL FOR NEXT