Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : ऑनलाइन जॉबची ऑफर आली, तरूणही भुलला, टप्प्याटप्प्याने पुढे घडलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली!

Jalgaon News : जळगाव शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत राहणार राहुल कृष्णा चौधरी (वय २६) हा वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दरम्यान त्याला ७ ऑक्टोबरला टेलिग्रामवर एक मेसेज आला

Rajesh Sonwane

जळगाव : ऑनलाइन जॉबची ऑफर देऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख ७२ हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ठगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव (Jalgaon) शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत राहणार राहुल कृष्णा चौधरी (वय २६) हा वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दरम्यान त्याला ७ ऑक्टोबरला टेलिग्रामवर एक मेसेज आला. त्यावर रमा लक्ष्मी नावाच्या व्यक्तीने मी प्राइस रनर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून चांगल्या कमाईचे ऑनलाइन जॉब पाहिजे असल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. या मेसेजकडे राहुलने दुर्लक्ष केले. मात्र ११ ऑक्टोबरला पुन्हा त्याला हा मेसेज पाठविण्यात (Cyber Crime) आला. यात जॉबवर ऑफर असून आठ हजारातच कामाला सुरूवात करता येईल, असे प्रलोभन देण्यात आले होते. याला बळी पडत राहुलने ऑनलाइन पैसे भरले. 

यानंतर दुसरी योजना सांगत नव्या सापळ्यात ओढले. यात लक्झरी प्रोडक्ट मिळाले असून ते मिळविण्यासाठी १५ हजार रूपये भरावयास सांगितले. ही रक्क्म देखील त्यांनी भरल्यानंतर ठगांनी राहुल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ९ हजार ८०० रूपये त्यांच्या खात्यावर पाठविले. नंतर १९ ऑक्टोबरला पुन्हा मेसेज पाठवत आमच्या वेबसाइटवर तुमच्यासाठी आणखी ऑफर आहे. म्हणून ३० हजार रूपये भरावे लागतील असे सांगितल्यावर राहुल याने पुन्हा ३० हजार रूपये भरून ऑनलाइन कामाला सुरूवात केली. असे करत वेळोवेळी एकूण ४ लाख ७२ हजार रूपयांची रक्कम राहुल याने पाठविली.

ती रक्कम काढण्यासाठी त्यांच्याकडे अडीच लाख रूपयांची मागणी केल्याने फसवणूक झाल्याचे राहुलच्या लक्षात आले. यामुळे त्याने पैसे परत मागितले असता समोरच्याने पैसे परत न केल्याने चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

SCROLL FOR NEXT