Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री, लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

Jalgaon News : ऑगस्ट २०२४ मध्ये ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा तरुणाने उचलले. तरुणीची मैत्री करत तिला लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर तिला हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले

Rajesh Sonwane

जळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्याने मैत्री करत लग्नाचे आमिष दाखवत तरुणींना जाळ्यात ओढत गैरवर्तन केले जात असल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत तरुणीला ब्लॅकमेलिंग करत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगावच्या जामनेर तालुक्यातील एका गावातील तरुणी हि महाविद्यालयीन शिक्षणासाठी एरंडोल येथे वास्तव्यास आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीची ओळख बुलढाणा जिल्ह्यातील बरेजवळा येथील विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७) या तरुणासोबत इन्स्ट्राग्रामवरून झाली. ऑगस्ट २०२४ मध्ये ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा तरुणाने उचलल्याचे समोर आले आहे. 

भेटायला बोलावत काढले आक्षेपार्ह फोटो 

दरम्यान विश्वजीत सिसोदे याने सदर तरुणीची चांगली मैत्री करत तिला लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर तिला जळगाव एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. यानंतर हॉटेलवर तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबध प्रस्तापित केले. इतकेच नाही तर त्याने काही व्हिडीओ व फोटो देखील काढले. हे आक्षेपार्ह व्हीडीओ, व्हॅट्सॲप चॅट तरुणीला तिच्या आई- वडिलांना दाखविण्याची भीती दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. 

अखेर पोलिसात गुन्हा दाखल 

तसेच पीडित तरुणीच्या वडिलांना व्हॉट्स ॲपवरून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडित तरुणीने कंटाळून घडला प्रकार पालकांना सांगितला. तत्काळ पालकांनी पीडितेला घेत एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. घडल्या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा जिल्ह्यातील विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT