Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : सराफ दुकानात हातचलाखी; महिलेने लांबविल्या सोन्याच्या १२ अंगठ्या

Jalgaon News : जळगावच्या सुवर्ण बाजारात सध्या लग्नसराईमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांची गर्दी आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सुवर्णपेढीत अंगठी घेण्याच्या निमित्ताने येऊन एका महिलेने हातचलाखी करत दुकानातील (Jalgaon) तब्बल १२ सोन्याच्या अंगठ्या लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शनिपेठ (Police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Breaking Marathi News)

जळगावच्या सुवर्ण बाजारात सध्या लग्नसराईमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांची गर्दी आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करत आहेत. मात्र सुवर्णपेढीतूनच अंगठ्या लांबविल्याची घटना समोर आली आहे. (Crime News) सराफ बाजारातील योगेश पंढरीनाथ सुवर्णकार यांचे सुभाष चौकातील भवानीमाता मंदिराजवळ शुभ लाभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दरम्यान २१ एप्रिलला सकाळी अकराला योगेश सुवर्णकार दुकानात असताना एक महिला (Gold) सोन्याची अंगठी घेण्यासाठी दुकानात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोन्याची अंगठी खरेदीचा बनाव करत एका मागून एक अनेक डिझाईन महिलेने बघितले. नंतर महिलेने हात चालाखी करत तब्बल १ लाख ७७ हजार ४०० रुपयांच्या १२ सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर योगेश सुवर्णकार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी महिलेविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपा किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT